कृषि उत्पन्न बाजार समिती, कारंजा (लाड) ही भारतातील स्थापन झालेली पहिली बाजार समिती आहे. सन 1886 ला हैद्राबाद रेसीडेन्सी ॲक्टनुसार भारतातील पहिला कापुस बाजार कारंजा (लाड) येथे सुरु झाला व त्या दिवसापासुन कारंजा कृषि उत्पन्न बाजार समिती अस्तीत्वात आली. महाराष्ट्र शासनातर्फे सन 2023-24 या वर्षाकरीता स्मार्ट प्रकल्पा अंतर्गत राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक क्रमवारी (रॅकींग) पणन संचालनालय कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी जाहीर केली. सदर क्रमवारीमध्ये कृषि उत्पन्न बाजार समिती ही राज्यात दुस-या क्रमांकावर व अमरावती विभागामध्ये प्रथम आली. सदर बाब आपल्या जिल्ह्यासाठी व आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आहे. परंतु कुठलिही गोष्ट नावारुपास येण्यास किंवा एखाद्या रोपटयाचे वटवृक्ष होण्यास कित्येक वर्ष लागतात आणि हा वटवृक्ष होण्यास ब-याच व्यक्तींची एकनिष्ठता सुध्दा लागते. कारंजा कृषि उत्पन्न बाजार समिती नावारुपास येण्यास सभापती, उपसभापती, सदस्य, सचिव, कर्मचारी, खरेदीदार, अडते, हमाल, मापारी, मदतनिस व ज्यांच्याकरीता बाजार समिती कार्यरत आहे, असा शेतकरी बंधु यांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांनी एकजुटीने काम केल्यामुळे आज कारंजा कृषि उत्पन्न बाजार समिती नावारुपास आली आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विकासामध्ये स्व.लक्ष्मणराव दहिहांडेकर माजी सभापती, स्व.नारायणदासजी संपट, माजी सभापती, स्व.बि.व्ही.शहा माजी सभापती, स्व.रुखबदासजी चवरे माजी सभापती, स्व.बाबुसींगभाऊ राठोड माजी सभापती, स्व.शेषराव पाटील लाहे माजी सभापती, स्व.नानासाहेब पोले माजी सभापती, श्री देवेंद्र पाटील घुले माजी सभापती, स्व. दिलीपराव देशमुख माजी सभापती, स्व.प्रकाश पाटील डहाके माजी सभापती, स्व.शालीकराम पाटील कानकीरड माजी सभापती, श्री काशिनाथ पाटील गुंजाटे माजी उपसभापती, स्व.श्यामसुंदरजी मालपाणी माजी उपसभापती, स्व.केशवराव खोपे माजी सभापती, स्व. दिगांबर पाटील चौधरी माजी उपसभापती, श्री गणेशराव पाटील काळे माजी उपसभापती, श्री सुरेश पाटील दहातोंडे माजी उपसभापती, श्री अशोक पाटील मुंदे माजी उपसभापती, व सर्व माजी सदस्य तसेच स्व. भानुकुमार गंगालालजी खेडकर माजी सचिव, श्री भुजंगराव वाळके माजी सचिव, श्री मुंगसाजी काठोये माजी सचिव, श्री अविनाश नांदगांवकर माजी सचिव, श्री अशोक पाटील दहातोंडे माजी सचिव, श्री नरेंद्र पाटील भाकरे माजी सचिव, श्री किशोर शिंदे माजी प्र.सचिव, तसेच सर्व माजी कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. कारंजा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवंगत माजी सभापती स्व.प्रकाशदादा डहाके यांच्या नेतृत्वात सन 2002 पासुन बाजार समितीने विशेष कामगिरी केली व स्व. दादा हे सलग 18 वर्ष बाजार समितीचे सभापती होते. त्यांच्या नेतृत्वात बाजार समितीमध्ये शेतक-यांकरीता विविध विकास कामे व विविध योजना शेतक-यांसाठी राबविण्यात आल्या. बाजार समिती नावारुपास येण्यास त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. त्यांचेच कार्याचे ध्येय ठेवुन विद्यमान सभापती मा.श्रीमती सईताई प्रकाश डहाके यांचे नेतृत्वात बाजार समितीची आणखी विकासाकडे घोडदौड सुरु असुन, शेतक-यांना उत्कृष्ट सेवा देण्याचे कामकाज संचालक मंडळ करीत आहे. शासनाने बाजार समितीचा गौरव केल्यामुळे स्व.दादांना आज खरी श्रध्दांजली अर्पण झाली आहे व हा पुरस्कार स्व.दादांना समर्पित आहे तसेच सदर पुरस्कार हा बाजार समितीमध्ये विश्वास ठेवणारे सर्व शेतकरी बंधु, सर्व आजी, माजी पदाधिकारी, कर्मचारी, खरेदीदार, अडते, हमाल, मापारी व मदतनिस यांना हा पुरस्कार समर्पित आहे. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे बाजार समिती नावारुपास आली आहे, असेच सहकार्य भविष्यात सुध्दा सर्वांचे लाभो हिच अपेक्षा...
